Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

डॉ. जगदीशचंद्र बोस

आपणही असे घडावे

डॉ. जगदीशचंद्र बोस 



वनस्पतीशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र जीवभौतिकीशास्त्र या विज्ञानातल्या अभ्यास शास्त्रासह बंगाली वाङ् मयातला पहिला विज्ञान कथालेखक, असं बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. जगदीशचंद्र बोस.


         वनस्पतींनाही जीव आणि भावना असतात. याशिवाय, उष्णता, थंडी, प्रकाश, आवाज आणि अन्य विविध कारणांनी बहुतांशी बाह्य वातावरणामुळे उत्तेजित होऊन प्रतिसाद देण्याच्या क्षमता वनस्पती आणि प्राण्यांमध्ये समान असतात, हे सप्रयोग सिद्ध करणारे डॉ. जगदीशचंद्र बोस पहिले वनस्पतीशास्त्रज्ञ होते. स्वाभिमान, आत्मविश्वास आणि बृद्धिमत्तेला दिलेली आव्हानं त्यांनी कधीही सहन केली नाहीत. वनस्पती आणि प्राण्यांमधल्या समान प्रतिसादावरच्या प्रयोगाच्या सादरीकरणाच्या वेळी लंडनच्या रॉयल सोसायटीचं सभागृह अनेक संशोधक आणि शास्त्रज्ञानी भरगच्च भरलेलं होतं. हा वनस्पतीशास्त्रातला अजब प्रयोग बघून संपूर्ण सभागृह आवाक् झालं आणि सारं सभागृह टाळ्यांच्या कडकडाटानं निनादत राहिलं, पण हे एवढ्यावरच संपलं नाही, तर काही संशोधकांनी त्यावर अनेक आक्षेप घेतल्यावर त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर बुद्धिमत्तेच्या तेजानं आणि वैज्ञानिक कसोटयांवर डॉ. जगदीशचंद् बोस त्यांना पुरून उरले. 


       ब्रिटिशकालीन बंगाल प्रांतातल्या (आताचा बांग्ला देश) मुन्सिगंज ( विक्रमपूर) इथं 30 नोव्हेंबर 1858 रोजी त्यांचा जन्म कायस्थ कुटुंबात झाला. वडील भगवानचंद बोस ब्रम्हो समाजाच्या मान्यवर नेतेगणांपैकी एक. फरिदपूर, वर्धमान आणि अन्य ठिकाणी ते उपन्यायाधीश आणि सहआयुक्त होते. इंग्रजी शिक्षण घेण्यापूवीं प्रत्येकाला स्वतःची मातृभाषा आणि समाजाची जाण अवगत असलीच पाहिजे म्हणून जगदीशचंद्रांचं प्रारंभीचं शिक्षण वडीलांनी देशीभाषांमधूनच केलं. नंतर ते हरे स्कूल ( 1869) आणि कलकत्ता विद्यापाठीची प्रवेश परीक्षा पास करून सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये दाखल झाले. तिथं फादर जेसूट यांनी त्यांच्यामध्ये निसर्गविज्ञानाची गोडी निर्मांण केली. इथून पदवीधर झाल्यावर त्यांना आय.सी.एस. (आताचे आयएएस) करण्यासाठी लंडनला जायचं होतं, पण वडिलांनी त्यास स्पष्ट नकार दिला. त्यांना आपला मुलगा विद्वान व्हावा, असं वाटत होतं त्यानंतर ते लंडन विद्यापीठात वैद्यक शिक्षणासाठी गेले, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे मायदेशी परतले. त्यांचे जावई आणि भारताचे पहिले रँग्लर आनंदमोहन बोस यांच्या शिफारशीवरून त्यांची निसर्गविज्ञानाच्या अभ्यासासाठी केंब्रिज विद्यापीठाच्या ख्रिस्त कॉलेजमध्ये निवड झाली याच विषयात बी.ए, झाल्यावर लंडन विद्यापीठाच्या लंडन कॉलेजमधून बी.एस्सी. ( 1884) आणि 1896 मध्ये तिथंच डी.एस्सी. झाले. लॉर्ड रेलिग, मायकेल फॉस्टर, जेम्स डेवर, फ्रांसिस बॉलफोर आणि सिडने विन्स हे त्यांचे प्राध्यापक होते, यातले काही नोबेल पुरस्कारविजेते होते हे विशेष. नोबेल पुरस्कारविजेते लॉर्ड रेलिग यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांनी संशोधन केले. जगदीशचंद्र केंब्रिजमध्ये असतानाच प्रफुल्लचंद्र राय एडिनबर्गला शिकत होते. लंडनमधये त्यांची भेट झाल्यावर पुढे ते घनिष्ट मित्र झाले. हेच प्रफुल्लचंद्र राय नंतर रसायनशास्त्रातले प्रसिद्ध संशोधक झाले. स्त्रीमुक्ती चळवळीतल्या प्रसिद्ध कार्यकर्त्या अबाला बोस यांच्यासोबत जगदीशचंद्र विवाहबद्ध झाले. त्यांच्यावर भगिनी निवेदिता यांच्या विचारांचा पगडा होता. इतकंच नाही, तर त्या जगदीशचंद्राना आर्थिक मदतीसह त्यांचं ग्रंथलेखन लवकर पूर्ण व्हावं म्हणून हस्तलिखितांच्या संपादनात मदतही करायच्या. केंब्रिजमधलं शिक्षण आटोपून परतल्यावर कलकत्ता विद्यापीठाच्या प्रेसिडेंसी कॉलेजमध्ये ते भौतिकशास्त्राचे प्राध्यापक झाले, पण साधनांचे अपुरेपण आणि वंशविद्वेवामुळे त्यांच्याच समकक्ष ब्रिटिश सहाध्यायांपेक्षा मिळणाऱ्या कमी वेतनाचा निषेध म्हणून या स्वाभिमानी माणसानं तब्बल तीन वर्ष वेतन न घेताच स्वतःला संशोधनात गाडून घेतलं. नंतर मात्र याच कॉलेजनं त्यांची रीतसर कायमस्वरूपी नेमणूक करून त्यांना सारं वेतन थकबाकीसह दिलं. मात्र, त्यानंतर ही नोकरी सोडून त्यांनी कलकत्त्यातच स्वतःची बोस इन्स्टिट्यूट उभारली.


   रिमोट वायरलेस सिग्नलिंगमध्ये विशेष संशोधन करून सेमिकंडक्टरमध्ये ते वापरून रेडिओ सिग्नल्स मिलीमीटरमध्ये मोजणारे ते पहिले संशोधक ठरले. पण त्यांनी या शोधाचं पेटेंट घेऊन व्यावसायिक फायदा न घेता त्यात अधिक सुधारणा करण्यासाठी सर्वसामान्यांसाठी है संशोधन खुलं केलं. वनस्पतीच्या रचनांमध्ये बरंच संशोधन करून त्यांच्या वाढ मापनासाठी लावलेला प्रसिद्ध क्रिस्कोग्राफीचा शोध असाच. या शोधातूनच त्यांनी बहुतांशी बाह्य वातावरणामुळे आणि विविध विषयुक्त आणि गुंगी आणणाऱ्या औषधांनीही उत्तेजित होऊन प्रतिसाद देण्याच्या क्षमता वनस्पती आणि प्राण्यांमध्ये समान असतात, हे सप्रयोग जगापुढं स्पष्ट केलं. या शोधाच्या सन्मानार्थ चंद्रावरच्या विवराला त्यांचं नाव देण्यात आलं आणि वनस्पतीशास्त्रात रेडिओ आणि सुक्ष्मलहरीच्या प्रयोगशील शास्त्रातली भारतीय उपखंडातली ही पहिली शोधकर्ति व्यक्ती. आयईईई या संस्थेनं तर त्यांना रेडिओ सायन्समधल्या पितामहांपैकी एक मानलेलं आहे. 1895 मध्ये त्यांचा पहिला शोधनिबंध एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालने, तर दुसरा शोधनिबंध त्याच काळात रॉयल सोसायटी ऑफ लंडननं प्रकाशित केला,  इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींची मिलीमीटरमध्ये लांबी किती, हा जीवभौतिकशास्त्रातला पहिला शोध त्यांनी लावला. इलेक्ट्रिकल आणि संगणक अभियांत्रिकीमध्ये मिलीमीटर बँड रेडिओचा प्रयोग मैलाचा दगड मानला जातो. 1896 मध्ये त्यांची लंडनमध्ये भाषणमाला आयोजित करण्यात आलेली होती. विज्ञानाच्या अनेक प्रांतात गती असली, तरी त्यांचं संशोधन प्रामुख्यानं निसर्गविज्ञानाचाच वेध घेत राहिलं.


        रिस्पाँस इन द लिव्हिंग अँड नॉनलिव्हिंग ( 1902)', 'द नर्व्हस मेकॉनिझम ऑफ प्लांटस ( 1926)' ही त्यांची गाजलेली पुस्तकं पलतक तुफान 1902)" हा 1921 मध्ये प्रसिद्ध झालेला बंगालीतला पहिला विज्ञानकथासंग्रह त्यांचाच. नंतर बोधिसत्व चटोपाध्याय यांनी त्याचं इंग्रजीत भाषांतर केलं. कंप्यानियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर (सीआयई) ( 1903), कंप्यानियन ऑफ द स्टार ऑफ इंडिया ( 1911), नाईट बॅचलर ( 1917 ), या सन्मानांसह व्हिएन्ना अकादमी ऑफ सायन्सेस ( 1928), चौथ्या इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष ( 1927 ), फिनिश सोसायटी ऑफ सायन्स ( 1929 ), कमिटी फॉर इंटेलेक्च्युअल्सच्या लिग ऑफ नेशन्सचे 1924 ते 1931 पर्यत सदस्य भारताच्या राष्ट्रीय विज्ञान संस्थेचे संस्थापक सदस्य, 2009 मध्ये इंडियन बोटानिकल गार्डनला त्यांचं नाव देण्यात आलं. हा भारताचा वैज्ञानिक सुपुत्र 23 नो्हेंबर 1937 रोजी तत्कालीन बंगाल प्रातांतल्या गिरीध इथं ( आता झारखंड) निधन पावला.


#वनस्पतीशास्त्र, #जीवशास्त्र, #भौतिकशास्त्र, #जीवभौतिकीशास्त्र,

 #डॉ. जगदीशचंद्र बोस, #वनस्पतीशास्त्रज्ञ, #संशोधक, #बंगाल,

#सेंट झेवियर्स, #लंडन, #प्राध्यापक, #केंब्रिज

Post a Comment

0 Comments