Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

जीवनातील आनंदी आणि सुखी आयुष्याचा 'फॉर्म्युला' काय असतो ?

जीवनातील आनंदी आणि सुखी आयुष्याचा 'फॉर्म्युला' काय असतो ?

1. Two children stand on a rock, joyfully raising their arms in the air, celebrating a moment of happiness outdoors.    2. Two children on a rock, arms raised high, expressing joy and excitement in a playful outdoor setting.    3. Two children stand triumphantly on a rock, arms lifted in celebration, enjoying a sunny day in nature.

जीवनातील आनंद आणि सुख हे नेहमी आपल्या सोबतच असते, केवळ गरज असते आपण त्याकडे, त्या दृष्टीने पाहण्याची. अर्थात यासाठी तुम्हाला वेगळे असे काही करावे लागत नाहीं. फक्त जे तुमच्याकडे आहे त्याची तुम्हाला जाणीवर करून घ्यावी लागते. आता ही जाणीव कशी होईल. तर त्यासाठी या गोष्टी तुम्हाला कटक्षाने पाव्व्या आणि समजून घ्याव्या लागतील. काय आहे त्या गोष्टी घ्या जाणून. 

स्वतःला ओळखा 
आपल्यापैकी अनेक व्यक्ती नेहमी स्वतःला दोष देत असतात. पहिल्यांदा तसे करणे बंद करा, याचा अर्थ, इतरांना दोष द्या, असा नव्हे. आयुष्यात संघर्ष हा अटळ आहं. तशाच चुका आणि अपघातही अटळ आहेत. आवश्यकता असते ती या सवांतून मार्ग काढण्याची. त्यासाठी स्वतःला पुरपूर ओळखण्याचा प्रयलन करा. जेणेकरून तुम्ही काय करू शकता, हे तुम्हाला कळेल. एकदा का तुम्हाला तुमची ओळख पटली तर, तुमच्या ध्येयापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. अगदी अपयशसुद्धा .

नवीन-नवीन गोष्टी  शिकण्याचा प्रयत्न करा
 आपले जीवन हे अनेक घटना, घडामोडींनी बनलेला एक समुद्र आहे. ज्यात अनुभव, अनुभूती यांचे प्रत्यंतर क्षणोक्षणी यते. अशा वेळी प्रत्येक प्रसंगातून काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करा, तसेच तुम्ही जे नवे शिकता त्यावा प्रसंगानुरूप तुमच्या आयुष्यात वापर करण्याचाही प्रयत्न करा. नवीन गोष्टी शिकणे ही देखील एक प्रक्रिया आहे, जी जीवनाला आनंद देऊन जाते.

सकारात्मक विचार करा 
जीवनात घडणाऱ्या अप्रिय  घटना, अपयश, संघर्ष आदी गोष्टींमुळे अनेकदा मनात नकारात्मक विचार येण्याची शक्यता असते. नकारात्मक विचार आपल्या आयुष्यातील आनंद हिरावून येतो. म्हणूनच नेहमी सकारात्मक विचार करा. सकारात्मक विचार हा नेहमीच आनंददायी असतो. लक्षात ठेवा, जगातील कोणतीच घटना नकारात्मक नसते. त्यातून काहीतरी सकारात्मक संदेश ह्य मिळतच असतो., फक्त तो शोण्याची दृष्टी आपण निर्माण करावी लागते. 

संपर्कात रहा 
नेहमी लोकांच्या संपर्कात राहा, संवाद साधा. असे केल्याने लोकांची सुख-दुःखे आपणास संपर्कात समजतात. आपल्या अडचणी समोरच्याला लक्षात येतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या सुख-दुःखात आपल्याला सहभागी होता येते, तसेच आपल्या अडचणी सोडविण्यासाठी समोरच्याची मदतही होते. असे केल्याने दोघांच्याही जीवनाचा मार्ग सुखकर होतो. 

#life #happiness  #thoughts #inspirational 


Post a Comment

0 Comments