Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

असे कोणते आठ शब्द आहेत जे तुमचे आयुष्य बदलवू शकतात

असे कोणते आठ शब्द आहेत जे तुमचे आयुष्य बदलवू शकतात

1. Two individuals joyfully raising their hands together in a display of unity and celebration.    2. Two people enthusiastically lifting their hands in unison, symbolizing teamwork and shared achievement.    3. Two individuals with their hands raised together, expressing solidarity and collective spirit.


मला एवढेच ठसवायचे आहे की, नकारात्मक विचारांऐवजी सकारात्मक विचारांचा विचार करा. दुस्या शब्दात सांगायचे, तर आपल्याला आपल्या समस्यांसंबंधित काळजी वाटणे ठीकच आहे, पण त्याची विंता मात्र नको.

 

आजवरच्या आयुष्यात तुम्ही कोणता मोठा धडा शिकले ?, असा प्रश्न मला काही वर्षांपूवीं एका आकाशवाणी कार्यक्रमात विचारण्यात आलेला होता. उत्तर फारच सोपे होते. आपण कसा विचार करतो, हा अनेक महत्तवाच्या धड्यांपैकी मी आजवर सर्वात मोठा धडा शिकलेलो होतो. मला जर माहीत आहे की, तुम्ही कसा विचार करता, तर आपण कसे आहात, हे मी सांगू शकेन. आपली विचार करण्याची पद्धती हा क्ष घटक आहे की, तो आमचे प्राक्तन ठरवित असतो. इमर्सन म्हणतात की, 'माणूस नेहमीच कसा विचार करीत आलेला आहे, यावरूनच तो ठरतो. '.. त्यापेक्षा तो वेगळा कसा काय असू शकतो...?

मी अगदी ठोसपणे सांगू शकतो की, योग्य विचार नेमके कोणते, हेच न समजणे, हीच तुम्हा-आ्हाला भेडसावणारी सर्वांत मोठी समस्या आहे, याबद्दल आता माझ्या मनात कोणताच संशय राहिलेला नाही. आपण जर हे समजू शकलो, तर आपण आपल्या जवळजवळ सर्वच समस्या सोडवू शकतो. रोमन साम्राज्यावर अधिराज्य गाजविणारा मोठा तत्त्वज्ञ मार्कस औरेलिस याने याचेच सार फक्त आठ शब्दांमध्ये सांगितलेले आहे. असे आठ शब्द की, जे तुमचे नशीब निश्चित करते. काय आहेत ते आठ शब्द  "आपल्या विचारा प्रमाणेच आपले आजचे आयुष्य घडत असते."

होय, हे खरे आहे. आपण जर आनंदी विचारांचाच विचार करू, तर आपण आनंदी होऊ आणि याउलट, जर आपण दीन-दुःखी विचारांचाच विचार करू, तर आपण दीन-दुःखी होऊ, त्याचप्रमाणे आपण जर भीतीदायक विचारांचा विचार करू, तर आपल्याला भीतीच वेढून घेईल आणि जर आजारपणाच्या विचारांचा विचार करू, तर कदाचित आपण आजारीच पडू. अपयशी विचारांचाच विचार निशिचितच आपल्याला अपयशीच करेल. आपण जर सहानुभूती मिव्वविण्याचाच विचार करू, तर प्रत्येकच जण आपल्याला टाळेल. नॉर्मन विन्सेंट पील म्हणतात की, 'तुम्ही कसे आहात याचा तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही नसता, तर जसा विचार करता तसेच तुम्ही आहात.'

मी आमच्या सर्व समस्यांचा नेहमीप्रमाणे एका ठराविक साच्यातून विचार करीत आहे का? नाही, तसे नाही, दुर्देवाने, तसा विचार करण्याइतकेही आयुष्य सोपे नाही. मला एवढेच ठसवायचे आहे की, नकारात्मक विचारांऐवजी सकारात्मक विचारांचा विचार करा. दुसऱ्या शब्दात सांगायचे, तर आपल्याला आपल्या समस्यांसंबंधित काळजी वाटणे ठीकच आहे, पण त्याची चिंता मात्र नको. आता चिंता आणि काळजी वाटणे, यात काय फरक आहे, हे मी स्पष्ट करतो. प्रत्येक वेळी मी न्यूयॉर्कमधील मोठे रहदारीचे रस्ते ओलांडून पार करतो. त्यावेळी मी काय करीत आहे, याची मला माझी काळजी वाटत असते, पण चिंता मात्र असत नाही. काळजी वाटणे म्हणजे समस्येची पूर्ण जाणीव असणे आणि त्या सोडविण्यासाठी शांतपणे पावले टाकणे. याउलट, चिंता करणे म्हणजे, अत्यंत त्रासदायक आणि निष्फळ अशा वर्तुळा भोवती फिरत राहणे होय.

(डेल कार्नेगी यांच्या

"How To Stop Worrying and Start Living"

या पुस्तकाचा स्वैर अनुवाद)

Post a Comment

0 Comments