निरोगी राहण्यासाठी कोणालाही पाच साधे आणि सोपे उपाय योजना येतात. साखरेच्या प्रमाणाबाबत प्रत्येकाने सावध राहिले पाहिजे. उपवास, व्यायाम, पूरक अन्न आणि ध्यानधारणा यांचा अवलंब केला पाहिजे.
साखर :
साखर खायचे बंद करा. साखर हे विष आहे. कर्करोग होण्याच्या अनेक प्रमुख कारणांपैकी साखरही एक आहे. साखरेमुळे कर्करोग वाढतो. माणसाला साखरेचे व्यसन लागते. साखर शरीरातील प्रतिकार यंत्रणा कमकुवत करते आणि शरीरातील सर्व खनिजे नष्ट करते. त्यामुळे जास्त भूक लागते.
उपवास :
जेव्हा तुम्ही खाता तेव्हा तुमच्या शरीरातील पेशींची संख्या वाढू लागते व त्यांच्या वाढीची प्रक्रिया सुरू होते. जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा 18 तासांनी तुमच्या शरीरातील पेशी देखभालीची किंवा दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करतात. 18 तासानंतर ही प्रक्रिया अधिक वेगवान होते.
व्यायाम :
व्यायाम आवश्यक, रोज किमान 30 मिनिटे भरभर चाला. आठवड्यातील 3 दिवस चालण्याच्या व्यायामाच्या जोडीला अन्य व्यायाम करा. उड्या मारणे, जोर काढणे, नृत्य, सूर्यनमस्कार इत्यादी. आपण अनेकदा व्यायामाबद्दल खूप बोलतो पण करत काहीच नाही. व्यायाम ही बोलण्यापेक्षा करण्याची गोष्ट आहे.
पूरक अन्न :
आपले बहुतेक धान्य मातीतून उगवते. त्यामुळे त्यात बहुतेक पोषक तत्वे असतात. विशेषत: सूक्ष्म पोषण तत्वे. ज्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमचा समावेश होतो. शरीराला तब्बल 68 वेगवेगळी पोषण तत्वे आवश्यक असतात. त्यातील एखादे जरी कमी पडले तरी व्याधी निर्माण होऊ शकतात.
ध्यानधारणा :
सगळ्या दुखण्याचे मूळ तपासाचे म्हटले तर शेवटी ते तुम्ही सोसलेल्या ताणतणावात सापडते. त्यामुळे तणावमुक्त जगण्याचा सराव करा. त्यासाठी ध्यानधारणेचा आश्चर्यकारक उपयोग होतो. ध्यानधारणेमुळे तुम्हाला शरीरातील ऊर्जेची जाणीव होते. शरीरातील पेशी या जैवरसायनावर काम करत असतात. परंतु पेशीत सिलिया असतात. त्या विद्युतचुंबकीय जैवक्षेत्राशी विद्युतशक्तीद्वारे संपर्क साधत असतात. अशा ऊर्जेचा प्रवाह अडवला किंवा त्यामध्ये अडथळा आला तर काय होते याची संवेदना तुम्ही जाणून घ्या. या ऊर्जेचा तुमच्यातील वेदना, आजारपण, दुखापत यांच्याशी संबंध असतो. त्यामुळे हा प्रवाह वाहता कसा राहील हे शिकून घ्या. त्यासाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरते.
0 Comments