स्पर्धात्मक जगात आत्मविश्वास वाढवण्यासाठी सर्वांत १३ सोपे नियम
Believe in Yourself (स्व : आत्मविश्वास)
स्पर्धात्मक जगात आत्मविश्वास वाढवण्याचा सर्वांत चांगला मार्ग हा आहे की,
》सर्वांत आधी ते काम करावे जे तुम्हाला सर्वात अवघड वाटते किंवा ज्या गोष्टीचे अधिक भय वाटते. त्याच गोष्टीचा आधी सामना करावा. म्हणजे मन खंबीर बनते.
- आठवड्यातून एकदा अशा लोकांना जरूर भेटा जे लोक तुम्हाला पसंत करतात.
- तुम्ही जीवनात आतापर्यंत काय काय मिळवले आहे याची यादी सतत डोळ्यापुढे ठेवा. तुमच्या व कार्यक्षेत्रातील नव्या नव्या गोष्टी सतत शिकत राहा.
- आत्मविश्वास असणाऱ्या लोकांशी अधिकाधिक संपर्क वाढवा.
- जास्तीत जास्त सभा-समारंभांना आणि कार्यक्रमांना उपस्थित राहा.
- सतत क्रियाशील राहा. थांबू नका. तुमच्या कामात खंड पडल्यास तुमच्यातील आत्मविश्वास कमी होऊन जाईल.
- अनावश्यक गोष्टींचा विचार मनातून काढून टाका. नेहमी चागल्याच V दृष्टिने विचार करा. त्यासाठी कायम व्यस्त राहा म्हणजे वाईट विचार मनातच डोकावणार नाहीत.
- आनंद आणि दुःख या दोन्ही भावनांनी कधीही अस्वस्थ होऊ नका. काहीही घडले तरी त्याकडे अगदी सहजतेच्या दृष्टीने बघण्यास शिका.
- ज्या कामात तुम्ही अयशस्वी व्हाल, त्याच कामात पुन्हा नव्या उत्साहाने मन गुंतवा आणि ते काम यशस्वी होईपर्यंत तुमचे प्रयल्न सोडू नका.
- इतरांना मिळालेल्या यशामुळे तुमच्या मनात ई्ष्या निर्माण होऊ देऊ नका आणि अस्वस्थही होऊ नका. तुमचे जे काम आहे ते तुमच्या पद्धतीने करत राहा. त्यात तुम्हाला कधी ना कधी निश्चितच यश मिळेल,
- अन्याय कधीही सहन करू नका. अन्याय सहन केल्याने तुमच्यातील आत्मविश्वासाचे खच्चीकरण होते. अन्याय सहन करण्याची प्रवृत्ती तुम्हाला कायमचे गुलाम बनवून टाकेल. घडलेल्या अन्यायाचा वेळीच प्रतिकार करायला शिका.
- काम सुरू करण्यापूर्वी त्या कामाबदृल थोडा वेळ विचार करा. ते काम वेगवेगळ्या पद्धतीने कसे करता येईल, याचे एका कागदावर नियोजन करा. त्यातील योग्य पद्धतीची निवड करून त्या पद्धतीनेच काम पूर्ण करा.
- तुमची जी योग्यता आहे त्याच योग्यतेचे काम करा. मोठ्या पदावर काम करण्याची तुमची योग्यता असताना उगाचच कमी योग्यतेचे काम स्वीकारू नका.
- तुमच्या जीवनात काहीही घटना घडत असल्या तरी मन नेहमी प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा.
गुरुवार, 5 डिसेंबर 2024
0 Comments