यशस्वी होण्यासाठी 5 पंचसूत्री महत्त्वपूर्ण का असतात 1) ज्ञान - ज्ञान म्हणजे तुमचा अभ्यास, शिक्षण आणि जीवनाचे अनुभव, तुम्ही एखाद्या अडचणींत असल्यास ज्ञानाच्या माध्यामातून त्यातुन सुखरूप बाहेर पडू शकतात. 2) विनय - विनय म्हणजे विनम्रता, तुम्ही विनम्र असाल तर तुम्ही सर्वांशी प्रेम आणि आपुलकीने सवांद व चर्चा करतात, हा गुण तुम्हाला प्रत्येक संकटापासून दूर ठेवतो. 3) विवेक - विवेक म्हणजे बुद्धी, जी तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्रदान करते, या गुणामुळे तुम्ही संकटाची चाहूल लागताच त्यावर मात करू शकता. 4) साहस - हा गुण तुम्हाला संकटावर मात करताना लढण्यासाठी मदत करतो, धाडसाच्या बळावरच तुम्ही कोणत्याही मोठ्या संकटाचा सहजपणे सामना करू शकतात. 5) चांगले काम - तुम्ही एक चांगले व्यक्ती असाल आणि आयुष्यात कोणाचेही वाईट केले नसेल, नेहमी चांगले कर्म केले असतील तर त्याच्या फळ स्वरूपात तुम्हाला अडचणींतून मुक्ती मिळू शकते.
0 Comments