मंडळी,
जे लोक प्रयत्नवादी असतात, त्यांना जगातील कोणतीही गोष्ट, कोणतीही कृती, ही अशक्य वाटत नाही; कारण त्यांचा विश्वास प्रयत्नांवर असतो आणि त्यामुळेच ते प्रत्येक गोष्ट करून पाहतात.
- हे लोक यश किंवा अपयश याचा विचार सोडून देतात आणि प्रयत्नांची शिकस्त करतात.
- अशा लोकांना काहीही अवघड वाटत नाही कोणताही नवा प्रयत्न त्यांना अडचणीचा वाटत नाही, कोणताही नवा प्रयत्न त्यांना अडचणीचा वाटत नाही.
- एखादा पर्वत चढू चढून जाणं, समुद्राचा तळ गाठणं किंवा एखादा समुद्र ओलांडून जाणंही त्यांना अशक्य वाटत नाही,
- ही अमुक एक गोष्ट आपल्याला जमणार नाही, असं त्यांच्या मनात येत नाही. कारण, या अशा लोकांचा सगळा भर हा त्यांच्या आत्मविश्वास आणि कर्तुत्वावर असतो. त्यांना हिमतीवर भरवसा असतो म्हणूनच, ते अडचणींमुळे मागे हटत नाहीत. सगळ्यात उद्योगी किंवा प्रयत्नवादी मंडळींमध्ये ही वैशिष्ट्य अगदी सहजपणे आढळतील,
0 Comments