शौर्य :
चांगल्या उज्वल भविष्यासाठी अतिशय अवघड वाटणाऱ्या आणि मनात साशंकता असणाऱ्या गोष्टीं करण्यासाठीचा पुढाकार ही गोष्ट अनमोल असते.
प्रश्न विचारणे :
तुम्ही काही मेंढ्यांच्या वंशात जन्माला आलेले नाहीत. कळप चालला आहे त्या दिशेने मुकाट्याने चालण्याची गरज नसते. प्रश्न विचारा. सगळे करत आहेत म्हणून त्यांच्याप्रमाणे कोणतीही गोष्ट करण्याचा प्रयत्न करत बसू नका.
सचोटी व इतरांना प्रोत्साहन :
जगात भरपूर नकारात्मकता भरलेली आहे. सर्वच गोष्टींसाठी नकारात्मकता दर्शवू नका, त्यात आणखी भर घालून गरज नसते. प्रत्येकाने समाजाची, इतरांची मान्यता घेऊनच पुढे जावे, अशी अपेक्षा ठेवू नका. उलट वेगळ्या रस्त्याने जाणाऱ्यांना, सचोटीने व प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना प्रोत्साहन द्या.
पुढाकार घ्या :
आयुष्यात समस्या येतच असतात, उपायांकडे लक्ष द्या. जर एखादे काम आवाक्याबाहेरचे असेल तर ते सोडून द्या. तुम्हाला जे करायचे आहे त्यासाठीचा मार्ग शोधा.
0 Comments