अनेकदा आपण आपलं काम वेळेत पूर्ण करू शकत नाही आणि नंतर त्याविषयी पश्छाताप होतो. ही समस्या वेळेचं व्यवस्थापन करू न शकण्याची आहे. यासाठी मोठे ध्येय गाठायाचं असेल तर त्याच्या छोट्या-छोट्या टास्क तयार करा, ते पूर्ण करण्यासाठी पाऊल उचला.
- ध्येय स्वच्छ ठेवा
उशीर झाला म्हणून याचा आपल्याला पश्छाताप होत असेल आणि ही सवय आपण सुधारू इच्छित असो, तर आपल्याला आपल ध्येय स्पष्ट करायला हवं हे माहीत असायला हवं की, आपल्याला काय हंव ? आपल ध्येय काय आहे ? जोपर्यंत आपण आपल ध्येय ठरवून पुढे जात नाही, तोपर्यंत आपण भटकत राहू.
- ध्येयाला तुकड्या मध्दे विभागा
स्वतःला सुधारण्याच्या दृष्टिकोनातून पुढे जाण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे ध्येयाला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागा. मोठ आणि अशक्य ध्येय ठरविण्याऐवजी व्यावहारिक ध्येय ठरवा. त्यासाठी लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म यामध्दे विभागा. सगळ्यात अगोदर पाच वर्षाचा प्लॅन तयार करा, त्यानंतर त्याची एक - एक वर्षामध्दे विभागणी करा.
- एकापासून सुरवात करा
एका वर्षाच्या प्लॅन मध्दे तुमची कोणतीही वाईट सवय सुधारण्याचा प्रयत्न करा.
- पहिलं पाऊल
या सवयी अश्या छोट्या - छोट्या गोष्टी आहेत, ज्यांना थोड्याशा प्रयत्नद्वारे आपण दूर करू शकतो, फक्त त्यासाठी पहिलं पाऊल उचलण्याचा उशीर आहे...ज्या दिवशी पहिलं पाऊल उचलाल त्या दिवसापासून तुमचं ध्येय गाठण्याचा प्रवास सुरू होईल...हे छोटे-छोटे प्रयत्नच आपल्याला एक दिवशी मोठं यश देतील.
- स्वतःचं कौतुक करा
ध्येय गाठण्याचा दृष्टिकोनातून तुम्ही प्रवासाला सुरवात केली आहे, अशावेळेस काही अडचणी सुद्धा येतील. अशावेळेस सतर्क रहा. जेव्हा तुम्ही एक ध्येय गाठाल, त्याविषयी स्वतःला शाबासकी द्या. यामुळे पुढील ध्येय गाठण्यासाठी नक्कीच हुरूप येईल. त्याचबरोबर तुमच्याकडून ज्या वेळी चुक होईल किंवा तुम्ही आळशीपणा कराल तेव्हा स्वतःला रागवायला, आत्मपरीक्षण करायला विसरु नका. स्वतःला असं वेळोवेळी तोलून बघण्याने यशाचा मार्ग सुकर होण्यास निश्चितपणे मदत होईल.
0 Comments