सुर्यफुल हे नेहमी सूर्याच्या दिशेने चेहरा करते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ते प्रकाशाचा पाठलाग करत असते.
सूर्याकडे तोंड करण्याच्या चमत्काराला सुर्यानुवर्तन असे म्हटले जाते.
हे तुम्हाला आधीच माहीत असण्याची शक्यता आहे, परंतु आणखी काही माहिती तुम्हाला ठाऊक नसेल.
जेव्हा पावसाळी आणि ढगाळ हवामान असते आणि सूर्य ढगांच्या मागे झाकला गेल्याने प्रकाश हा सुर्यफुल पर्यंत पोहचत नसतो, तेव्हा विचार करा बरं...सुर्यफुल काय करतात..?
तुमच्या मनात येऊ शकते की, अशावेळी सुर्यफुल निराश होऊन जमिनी च्या दिशेने मान करतील. परंतु सुर्यफुल तसे करत नाहीत.
सुर्यफुले परस्परांकडे तोंड करतात आणि आपआपली ऊर्जा दुसऱ्याशी शेअर करतात.
निसर्गातील परिपूर्णता आपल्याला चकित करणारी आहे. आता या सर्व गोष्टींचा आपल्या आयुष्यात सकारात्मक रीतीने उपयोग करायचा ठरवले तर काय होईल...?
अनेक व्यक्तीच्या आयुष्यातील उत्साह कमी झालेला असतो, त्या नैराश्यात असतात. अशावेळी परस्परांकडे तोंड करून एकमेकांना ऊर्जा दिली तर किती चांगले होईल...!
सुर्यफुला पासून हा आदर्श नक्कीच घेऊ शकतो. निसर्गात आपल्याला शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.
दुःखद आणि निराशाजनक काळामद्धे परस्परांकडे तोंड करून ऊर्जा शेअर करायची हा सुर्यफुलाचा गुणात्मक संदेश माणसांसाठी कितीतरी उपयुक ठरेल.
चांगुलपणा सगळीकडे पसरवा...तुमच्याकडे तो परत येत राहील.
0 Comments