Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

ध्येयमार्गावर योग्य नियोजन हाच यशस्वी जीवनाचा मंत्र का आहे

ध्येयमार्गावर योग्य नियोजन हाच यशस्वी जीवनाचा मंत्र का आहे

"रक्त सळसळत असलेल्या आणि उत्साह ठासून भरलेल्या प्रत्येक व्यक्तीची निश्चित स्वप्न असतात, त्यांनी आयुष्याचे ध्येय ठरवलेले असते. आयुष्यात काय कमवायचे आणि कसे कमवायचे याचा मार्ग त्यांनी निश्चित केलेला असतो. आयुष्याच्या वाटेवर अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी असतात."

1. A man walks along a bar chart, symbolizing progress, with an arrow pointing towards a target in the background.  2. A man strides across a bar chart, illustrating growth, while an arrow directs attention to a target ahead.  3. A man traverses a bar chart, representing achievement, with an arrow leading to a target in the distance.

अनेकदा एखादे स्वप्न किंवा पूर्ण व्हायला पाहिजे याची तारीख तुम्ही ठरवता; पण त्यासाठीचे वेळापत्रक आखत नाही आणि मग आपल्या प्रयत्नात अडथळे जातात असे वाटू लागते. आयुष्यात ध्येय नसेल तर वाट मिळेल तिकडे प्रवास करणाऱ्या भरकटलेल्या जहाजासारखी तुमची अवस्था होते. ध्येय निश्चित केल्यामुळे आयुष्यातील प्रवासावर तुमचे पूर्णपणे नियंत्रण राहते. एवढेच नव्हे तर आपण योग्य मार्गावर चालत आहोत किंवा कसे हे वेळोवेळी तपासून पाहता येते. ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना आणि कृती याविषयी.

कितीही कठीण उद्दिष्ट असले तरी विचारपूर्वक केलेले नियोजन आणि स्वतःच्या सवयीमध्ये जाणीवपूर्वक घडवून आणलेला बदल यामुळे यशाकडे वाटचाल करता येते. आपल्याला काय मिळवायचे आहे, साध्य करायचे आहे, हे प्रथम ठरवा. ठरवलेले उद्दिष्ट मोठे असू शकते किंवा छोटे असू शकते. परंतु, मोठे ध्येय साध्य करण्यासाठी टप्प्याटप्प्याने गाठता येतील अशी छोटी उद्दिष्टे निश्चित करून ती गाठता गाठता आपण ध्येयाच्या दिशेने वाटचाल करू लागतो. तेव्हा आपल्याला कुठे जायचे आणि त्याचा मार्ग निश्चित करावा लागतो.

नेमकेपणा :

अनेकांना आयुष्यात काय करायचे आहे हेच समजलेले नसते. अगदी खूप विचार केला तरी आपल्याला खरेच काय करायचे आहे याचे त्यांना आकलन होत नाही. तुम्हाला काय साध्य करायचे आहे याविषयीची ठोस निर्णय घेणे गरजेचे असते. तुमचे आयुष्य आणि करिअर कोणत्या दिशेने जावे, असे तुम्हाला वाटते त्यानुसार तुमचे ध्येय आणि वाटचाल असली पाहिजे.

नियोजन करा :

ध्येय निश्चित झाले की, ते साध्य करण्याची प्रबळ इच्छा तुमच्या मनात निर्माण होते. मग त्यासाठी नियोजन आवश्यक ठरते. नियोजन हे व्यावहारिक आणि शक्य होईल अशा पद्धतीने असावे. मग तुमचे ध्येय गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. त्यासाठी वाटेतील अनेक छोटी उद्दिष्ट साध्य करावी लागतील. या सगळ्यात प्रक्रियेत नियोजन आणि अंदाज महत्त्वाचा ठरतो.

कृतीला अतिशय महत्त्व :

शब्दांच्या बुडबुड्यापेक्षा कृतीला हजार पटीने महत्त्व असते. केवळ ध्येय निश्चित करून निवांत बसून चालत नाही. ध्येय निश्चितीसाठी आवश्यक ती कृती करा. तुमच्या अंतर्मनाच्या सांगण्यानुसार वागा. नव्या कल्पना, नव्या संधी आत्मसात करा. ध्येयाच्या दिशेने कृती करताना गरजेनुसार इतरांनी इतरांची मदत घ्या.


Post a Comment

0 Comments