हेन्री फोर्ड यांना ज्यावेळी एका वृत्तपत्रानं अज्ञानी संबोधलेलं होतं
"वेळ निर्माण करता येत नाही, ती खरेदी करता येत नाही, ती कमी किंवा जास्तही करता येत नाही. महत्त्वाचं म्हणजे, ती तुमच्यात आणि माइयात भेद करत नाही प्रत्येकाला सारख्या प्रमाणात ती उपलब्ध आहे, तरीही माणसा- माणसामध्ये भिन्नता आढळते. कोणी वेळेच्या सदुपयोगानं श्रीमंत बनतो, तर त्याच वेळेच्या दुरूुपयोगानं कोणी 'दरिद्री, कोणी ज्ञानवंत, तर कोणी निरक्षर कोणी सुधारक, तर कोणी समाजविघातक कोणी सुप्रसिद्ध, तर कोणी कुप्रसिद्ध."
एकदा हेन्री फोर्डनं 'शिकागो ट्रिब्यून' या वृत्तपत्रावर मानहानीचा दावा ठोकला. कारण, त्या वृत्तपत्रानं हेन्रीला अज्ञानी संबोधलेलं होतं. हेन्री यांनी त्यांना ते सिद्ध करून दाखवण्याचं आवाहन केलं. त्यानुसार क्विझ ठरली. ट्रिब्यूननं हेन्री यांना सामान्यज्ञानाचे अनेक प्रश्न विचारले. त्यात राजकीय, सामाजिक, खेळ, चित्रपट, या संबंधित प्रश्न होते. त्यापैकी काहीच प्रश्नांची उत्तरं हेन्री देऊ शकलेत. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं त्यांना येत नव्हती.
- ते प्रश्न ऐकून हेन्री रागातच म्हणाले, 'मला प्रश्नांची उत्तरं येत नाहीत, परंतु या प्रश्नांची उत्तरं देऊ शकणारा व्यक्ती मी अर्ध्या तासात शोधू शकतो.' थोडक्यात, डोक्यात रटलेलं ज्ञान असणारा हुशार असू शकत नाही. त्यात क्रिएटिव्हिटी असेल, काही तरी नवीन करण्याची, निसर्गातलं गुढ उकलण्याची जिज्ञासा असेल तोच खरा हुशार.
- काही रट्टा मारलेल्यांबद्दल आपल्याला सांगितलं जातं की, याला कोणत्याही देशाची राजधानी विचारा, भारतातल्या कोणत्याही राज्याची राजधानी विचारा, इतर काहीही विचारलं तरी हा सांगेल. अशाच एका रट्टा मारलेल्या उमेदवाराची मुलाखत घेण्यात आली आणि कंपनीच्या मालकानं त्याला सात हजार रुपये प्रतिमहा ऑफर केली. त्या कंपनीतला हा सर्वात कमी पगार होता. मालकाला एवढा कमी पगार देण्याविषयी विचारलं तेव्हा तो म्हणाला, 'मला माल विकण्याची कला असणारा माणूस पाहिजे. त्याचं ज्ञान कंपनीच्या कोणत्याच कामाचं नाही. त्यामुळे त्याला सात हजार रुपयेसुद्धा जास्त झालेत. त्याच्याकडे असलेलं ज्ञान मला सत्तर रुपयाचं सामान्यज्ञानाचं पुस्तक विकत घेऊन सहज मिळवता येईल.'
- स्वतःमध्ये कल्पकता असायला हवी. देवानं दिमाख दिला म्हणून तिचा कचराकुंडी करणारा नको. आपल्या बुद्धीचं प्रदर्शन करण्याच्या वा सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्यासाठी तुम्ही पदव्या मिळवत असाल, तर त्याचा फारसा उपयोग नाही. सामाजिक कार्य करताना आवड म्हणून अथवा त्या कार्याला पुरक म्हणून समाजशास्त्राची पदवी मिळवणं, हा तुमच्या सामाजिक कार्याला वेग देण्याचा एक भाग असू शकतो, परंतु फक्त पदवी मिळवण्याच्या उद्देशानं वयाच्या 75 व्या वर्षी अभ्यास करणाऱ्या आजोबांचा पदवी मिळवण्याचा उद्देश काही कळत नाही. तेवढाच वेळ आजोबांनी नातवांवर संस्कार करण्यासाठी, अनुभवाचा उपयोग समाजकार्यासाठी दिला असता, तर ती वेगळी उपलब्धी ठरू शकली असती. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग केलाच गेला पाहिजे, परंतु तो कुठं आणि कसा खर्च करावा, याचंही भान असावं. डोक्यात खूप माहिती भरली म्हणजे, ज्याचं डोकं असेल त्याची उपयुक्तता वाढली, असं होत नाही. तुम्ही मिळवत असलेलं ज्ञान कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक गरज भागवणारं असावं. गरज हीच शोधाची जननी राहिली, हेही ध्यानात घ्यायला हवं. जिज्ञासेनं त्याला वेग दिला. उपयुक्ततेनुसार कार्याला दिशा असावी. अन्यथा, अनावश्यक गोष्टींसाठी घालवलेला वेळ फुकट गेल्यासारखा होईल.
वेळेचा हिशेब
आपल्या जीवनात मागं वळून पहा. इथपर्यंत पोहोचण्यात वेळ कसा निघून गेला, हे कळलंसुद्धा नाही, असं तुम्हाला वाटेल. दिवसावर दिवस असेच जातात. कोणी याच कालावधीत मोठं यश मिळवतो, तर कोणी आहे तिथंच राहतो. सर्व वेळेच्या गुंतवणुकीचा महिमा !
- आपण जसा वेळ खर्च करतो, त्याप्रमाणेच जीवन जगत असतो. म्हणून स्वतःच्या वेळेचा एकदा तरी हिशेब लावा. फक्त दोन-तीन दिवस मागं जाऊन स्वतःला विचारा की, आपण कुठं कुठं वेळ घालवला, किती वेळ उपयोगात आणला गेला आणि किती वेळ विनाकारण गेला. एक तृतीयांश वेळ झोपण्यात जातो. उर्वरीत मिळालेल्या अर्ध्या अधिक वेळेचा अपव्यय झाला असेल तर... आपण किती मोठं नुकसान करत होतो, हे लक्षात येईल. अजूनही वेळ गेलेली नाही. जे झालं ते झालं. आता तरी आपण वेळेला जपलं पाहिजे. 50,400 सेकंद आपल्याला पूर्ण दिवसात वापरायचे. याचं मूल्य पैशापेक्षा अधिक आहे. ते पैशासारखं खर्च होत आहे, असं समजून जरी कार्य केलं तरी अपेक्षेपेक्षा जास्त मिळवता येईल.
कारण असावं
आपण अनेकदा वेळेचं नियोजन करतो आणि अनेकदा ते फसतं. ते का फसलं, याची शहानिशा न करता दहा-पंधरा दिवसानंतर आपण पुन्हा जैसे थे च वागतो. असं का होतं? त्याची तुम्ही, इच्छाशक्तीचा अभाव, ध्येय नसणं इत्यादी उत्तरं द्याल. आपापल्या दृष्टीनं त्यात सत्यता असू शकेलही, परंतु मानवी स्वभावगुणाचाही विचार व्हायला हवा.
- कोणतंही काम करण्याचं कारण मिळालं की, काम चांगल्याप्रकारे होतं. जसं सकाळी फिरायला जाण्याचा अनेकांना कंटाळा येतो, पण ज्यावेळी अटॅक येतो आणि डॉक्टर तुम्हाला फिरण्याविषयी सांगतात तेव्हा तुम्ही कंटाळा करणार का..! गोष्ट घडल्यानंतर कामाला सुरुवात करणं आणि तसं घडू नये म्हणून आतापासूनच कामाला लागणं, त्यासंबंधित वेळेचं नियोजन करणं, त्या वेळेच्या नियोजनामागे योग्य प्रेरणात्मक कारण शोधणं आणि वेळेचा सदुपयोग, हा स्वतःच्या सवयीचा भाग बनवणं महत्त्वाचं. दशरथ मांझीनं एकट्यानं 22 वर्षे सतत काम करून पहाड फोडला. असं ते करू शकलेत कारण, त्यांना त्यांच्या कामामागचं कारण सापडलेलं होतं. म्हणून मला हे का करायचं, याचं कारण शोधा. कारण सापडलं की, काम चांगल्या पद्धतीनं होतं.
किंमत समजा
वेळ निर्माण करता येत नाही, ती खरेदी करता येत नाही, ती कमी किंवा जास्तही करता येत नाही. ती तुमच्यात आणि माझ्यात भेद करत नाही. महत्त्वाचं म्हणजे, ती प्रत्येकाला सारख्या प्रमाणात उपलब्ध आहे. तरीही माणसा-माणसांमध्ये भिन्नता आढळते. माझ्याकडे वेळ नाही, असं म्हणणारा एक तर हमाल असू शकतो अथवा फार मोठा तत्त्वज्ञ असू शकेल.
- वेळेचं योग्य नियोजन केलं, तर वेळ प्रत्येकालाच मोठ्या प्रमाणात मिळतो. म्हणून वेळ नाही, हे कारणच असू शकत नाही. म्हणून रिकाम्या वेळेचा सदुपयोग व्हायला हवा. तुम्ही वेळेची किंमत करा, वेळ तुमची किंमत करेल. वेळ तुम्ही बरबाद कराल, तर वेळ तुम्हाला बरबाद केल्याशिवाय राहणार नाही.
कठीण वेळ
जीवनात कठीण प्रसंग प्रत्येकावरच येतात. असे प्रसंग सोडवण्याच्या दोन पद्धती असतात. एक म्हणजे, तुम्ही तुमच्या प्रॉब्लेमवर फोकस करून, दुसरं म्हणजे, तो प्रश्न कसा सोडवायचा, असा विचार करून. म्हणजे, सोल्युशन्सवर फोकस करून. प्रश्नावर फोकस कराल, तर प्रश्न अधिक वाढतील. उत्तरावर फोकस कराल, तर उत्तरंच मिळतील. म्हणून कठीण प्रसंगाला उत्तराच्या दिशेनं वळवा.
- कधी कधी आपल्याला अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं. अशा वेळी घाबरू नका, स्वतःचा संयम ढळू देऊ नका, स्वतः नकारात्मक बोलायचं टाळा. हळूहळू एक-एक पाऊल पुढं चालत रहा. तुम्ही ट्रॅफिकमध्ये फसल्यावर काय करता..? आपण आपली गाडी धिरे धिरे पुढं काढतो आणि ट्रॅफिक संपला, की वेग घेतो. असंच जीवनाचं आहे. प्रॉब्लेमच्या ट्रॅफिकमध्ये अडकू नका, धिरे धिरे चालत रहा, रस्ता बनवत जा.
सोमवार, 2 डिसेंबर 2024
0 Comments