सूर्यकिरणांच्यात असलेली उष्णता केंद्रीभूत बिंदूपाशी एकटवली जाते आणि या बिंदुपाशीचे तापमान वाढते.
प्रेषित होणाऱ्या विद्युत चुंबकीय तरंगाच्या रूपातील ऊर्जेला सौर ऊर्जा असे म्हणतात. हे तरंग जेव्हा एखाद्या वस्तूवर, घन किंवा द्रव पदार्थावर आदळतात तेव्हा त्या तरंगामध्ये असलेल्या ऊर्जेमुळे पदार्थातील रेणू कंप पावू लागतात. या कंपनांमुळे उद्दीपित होऊन रेणू आपापल्या जागा सोडू लागतात. ह्या चलनवलना मूळे उष्णता निर्माण होते. सौर ऊर्जेमधील या उष्णतेच वापर औद्योगिक व घरगुती वापरांकरिता मोठ्या प्रमाणावर केला जातो.
घरगुती वापरातील एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे सौरचूल. सौरचूल हे एक असे उपकरण आहे ज्यामध्ये पदार्थ शिजवण्याकरिता किंवा उकळविण्याकरता थेट सूर्यकिरणांमध्ये असलेल्या उष्णतेचा उपयोग केला जातो.
सौरचुलींचे पेटीसदृश्य सौरचूल व अन्वस्तीय सौरचूल असे दोन प्रकार पडतात. अन्वस्तीय सौरचूलीमध्ये सूर्यकिरणे परावर्तकाद्वारे परावर्तित होऊन एका बिंदूपाशी एकत्र होतात. सौरचूलीतील अन्वस्तीय तबकडी लोखंडाच्या गजापासून किंवा पातळ पत्र्यापासून बनवलेली असते. परावर्तक पदार्थ हा त्यावर पडलेली सूर्य किरणे परावर्तित करतो. ज्या पदार्थाची परावर्तनशीलता जास्त असते असे पदार्थ परावर्तक म्हणून वापरण्यात येतात. उदा. आरशाचे तुकडे, चकचकीत ॲल्युमिनियमचा पत्रा इ. परावर्तक पदार्थ अन्वस्तीय तबकडीच्या आतील बाजूला स्थापित करतात, अन्वस्तीय तबकडीच्या मध्यभागी अन्न शिजवण्यासाठी भांडे ठेवण्याची व्यवस्था असते, टेरेस वर, मोकळ्या जागी, किंवा सावली नसलेल्या ठिकाणी सौरचूल ठेवण्यात येते, सौरचूलीचा परावर्तक असलेला भाग सूर्यकिरणांच्या दिशेकडे तोंड करून ठेवतात, सूर्य पुर्वेकडे उगवून पश्चिमेकडे मावळतो. त्यामुळे दिवसभरात साधारण दर 20 मिनिटांनी सूर्यकिरणे आपले स्थान थोड्या अंशाने बदलत असतात. त्यामुळे सौरचुलीचा परावर्तक असलेला भाग सूर्यकिरणांच्या दिशेकडे तोंड करून ठेवण्यासाठी तीनही अंशात तबकडी फिरविता येईल अशा रीतीने तबकडी ठेवण्यासाठीची मांडणी केलेली असते. अशा रचनेमुळे परावर्तकावर पडलेली सूर्यकिरणे परावर्तित होऊन केंद्रीय बिंदूवर एकत्रित होतात. सूर्यकिरणांच्यात असलेली उष्णता केंद्रभूत बिंदूपाशी एकवटली जाते आणि या बिंदूपाशीचे तापमान वाढते. केंद्रीय बिंदूपाशी अधिकतम तापमान 3500 सेल्सिअस पर्यंत मिळू शकते.
0 Comments